Pedii Box Office Collection : पेड्डीचा बॉक्स ऑफिसवर धडाका! 2 दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) यांचा बहुचर्चित 'पेड्डी' (Peddi) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Colletion) दमदार सुरुवात करण्यात यशस्वी ठरला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने सर्व भाषांमधून मोठी कमाई करत निर्मात्यांना दिलासा दिला. रिलीजपूर्वी झालेल्या पेड प्रिव्ह्यू शोंनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपटाने पेड प्रिव्ह्यूमधून सुमारे १८.५० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर गुरुवारी प्रदर्शित झालेल्या पहिल्या दिवशी चित्रपटाच्या खात्यात ५१ कोटी रुपयांची भर पडली. त्यामुळे सुरुवातीच्या दोन दिवसांतच चित्रपटाने मजबूत कमाई नोंदवली.



मात्र दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाल्याचे दिसून आले. रिपोर्टनुसार, शुक्रवारी 'पेड्डी'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे २६.९० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. यामुळे भारतातील चित्रपटाची एकूण कमाई ९६.४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

जागतिक स्तरावरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 'पेड्डी'ने जगभरात १५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात मजबूत सुरुवात केली असल्याचे चित्र दिसत आहे.

चित्रपटाचे बजेट सुमारे ३५० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतील कमाई चित्रपटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः शनिवार आणि रविवारी प्रेक्षकांची गर्दी वाढल्यास चित्रपटाला मोठा फायदा होऊ शकतो.

दरम्यान, शनिवारच्या कमाईनंतर 'पेड्डी' भारतात१०० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पहिल्या विस्तारित वीकेंडअखेर चित्रपट किती कमाई करतो याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Sonu Nigam : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीवरून गायक सोनू निगमची सणसणीत ट्विटर पोस्ट, म्हणाला...

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादात आता गायक सोनू निगमने (Sonu Nigam) भूमिका

Kon Honaar Crorepati : माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर; सूत्रसंचालक म्हणून स्वीकारलेल्या नव्या भूमिकेबद्दल म्हणाली...

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता एका नव्या आणि अनोख्या

Salman Khan : रोमँटिक हिरो ते ‘भाई’! सलमान खानच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास

एक अभिनेता ज्याने जवळपास चार दशकं बॉलिवूड गाजवलं, अनेक चढ-उतार अनुभवले आणि तरीही त्याचं नाव ऐकताच थिएटरमध्ये

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे