Deepa Sawant-Khot : मर्डर मिस्ट्रीची ‘तलास’

कलेची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यातून मार्ग काढून त्या कलेची निर्मिती करतात. ‘तलास’ हा नवीन मर्डर मिस्ट्री चित्रपट निर्माण करण्याचे धाडसी पाऊल उचलणाऱ्या एक निर्मात्या आहेत व त्यांचं नाव आहे दीपा सावंत-खोत.



बावशी हे त्यांचं गाव. नांदगावमधील सरस्वती हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. शाळेत असताना त्यांनी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. शिक्षक दिनाला त्यांनी घेतलेल्या पाठामुळे शिक्षकी पेशेची आवड निर्माण झाली. त्यांचे निबंध प्रत्येक वर्गातून वाचून दाखविले जायचे. कणकवली कॉलेजमधून निबंध स्पर्धेतून त्या प्रथम आल्या होत्या. कणकवली जिल्ह्यातून बी. ए. मधून त्या प्रथम आल्या, त्यांनी बी. ए. नंतर एम. ए. केलं. एम. ए. लाही जिल्ह्यामधून त्या प्रथम आल्या. ज्या कणकवलीच्या कॉलेजमध्ये त्या शिकल्या त्याच कॉलेजमध्ये त्यांनी प्रोफेसर म्हणून काम केले. त्यानंतर सावंतवाडीमधून त्यांनी बी. एड. केले.



बी.एड.ला जाऊन सहा महिने झाले असता, त्यांना कळले की त्यांच्या पतीला ब्रेन टुमर झाला आहे. हे कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मोठ्या धैर्याने त्यांनी स्वतःला सावरले. पतीच्या उपचारासाठी त्यांनी मुंबई गाठली. उपचाराच्या काही महिन्यानंतर ते देवाघरी गेले. त्यांच्यावर झालेला हा काळाचा आघात खूप मोठा होता. त्यांनी स्वतःला परत सावरले. त्यांचा मुलगा वेदांत अभिनयाच्या क्षेत्रात आला. तू माझा सांगाती, कुल्फी कुमार बाजेवाला, धडकन अशा अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे.



दीपा यांनी नंतर दादरच्या आई. एस. ओरायन आई. सी. एस. ई. शाळेत, नंतर राजा शिवाजी विद्यालय, व्ही. एन. सुळे विद्यालय शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. सध्या त्या पद्मभूषण ताराबाई मोडक शिक्षण केंद्र, ताराबाई मोडक सेकंडरी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्या अगोदर कॉलेजमध्ये असताना त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेमधील एकांकिकेमध्ये भाग घेतला होता. त्यांनी तुला पाहते रे, तू माझा सांगाती, सुख म्हणजे नक्की काय असते, स्वाभिमान, सहकुटुंब सहपरिवार या मराठी मालिकांमध्ये काम केले, तर मेरे साई, धडकन, सपनो की छलांग, स्वराज या हिंदी मालिकेत त्यांनी काम केले. पेट पुराण या वेब सीरिजमध्ये देखील त्यांनी काम केले. मुद्रा लोन या सरकारी जाहिरातीमध्ये देखील त्यांनी काम केले.दीपा व निलेश भेरे यांनी ‘कळत्या नकळत्या वयात’ या नाटकात काम केले होते. त्यांनी दीपा यांना उदय गणपत जाधव यांची एक कथा सांगितली. ती त्यांना खूप आवडली. त्यांनी त्यावर चित्रपट निर्मिती करण्याचे ठरविले. हा त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला.



निर्मात्या दीपा सावंत - खोत यांनी दीप तारांगण क्रिएशनच्या बॅनरखाली ‘तलास’ या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तलास मध्ये प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री आहे. रहस्यमय घडामोडींची गुंतागुंत आणि अखेरीस होणारी रहस्याची उकल प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारी आहे. उदय गणपत जाधव यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा लिहिली असून दिग्दर्शन देखील केले आहे. रूपाली कुठे यांनी संवाद लेखन केले आहे. विजय गाडेकर यांनी गीत लिहिले असून संगीत दिग्दर्शन देखील केले आहे. ‘या गो बायांनो हळद घेऊनशी...’ या गाण्यावर गौतमी पाटीलने नृत्य केले असून नृत्य दिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केले आहे. गायिका वैशाली सावंत यांनी गाणे गायले आहे.



‘कळत्या नकळत्या वयात' या प्रायोगिक नाटकाची गेल्यावर्षी त्यांनी निर्मिती केली. त्यामध्ये त्यांच्यासोबत नीलेश भेंरे होते. त्यांनी या चित्रपटात इन्स्पेक्टरची भूमिका केली आहे. त्यांनी या चित्रपटाची कथा दीपाजीना सांगितली. त्यांना कथा आवडली. या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. कोळी समाजावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. एक कोळीण असते, ती कबाडकष्ट करून आपल्या मुलांना वाढवते. तिची मुलगी डॉक्टर होते. ती ज्या मुलासोबत लग्न करणार असते, त्याच्या सोबत तिचे लग्न होते का? त्याचे पुढे काय होते? हे सारे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे.



या चित्रपटामध्ये नृत्यांगना गौतमी पाटीलवर एक गाणं चित्रित करण्यात आले आहे. त्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, मला या चित्रपटामध्ये एक छान हळदी गाणे चित्रित करावयाचे होते, जे गाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक हळदीच्या कार्यक्रमामध्ये वाजले पाहिजे. विजय गाडेकर यांनी ही गाणे लिहिले असून त्यांनीच ते संगीतबद्ध केले आहे. मला त्यांनी ते गाणे पाठवले, ते ऐकताच क्षणी मी ठरवले की ते गाणे सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्याकडून गाऊन घेऊ या. आजीवासन स्टुडिओमध्ये या गाण्याचं गायिका वैशाली सामंत कडून रेकॉर्डिंग करण्यात आले. हे गाणे साधे चित्रित करायचे की त्यावर नृत्य बसवायचे याबद्दल चर्चा झाली, तेव्हा त्या गाण्यावर नृत्य बसवायचे असे ठरले. त्या गाण्यावर नृत्यांगना गौतमी पाटीलचे नृत्य बसवायचे असा मी शिक्कामोर्तब केला. गौतमीने जेव्हा हे गाणे ऐकले, तेव्हांच तिने त्या गाण्यावर नृत्य करण्याची उत्सुकता दाखवली.


आदल्या रात्री ती नृत्य दिग्दर्शकाकडे येऊन नृत्याची तालीम करून गेली. दुसऱ्या दिवशी ती मढ आयलंडला सेटवर आली, रात्री ७.३० ते ८.००. या वेळेला ती आली, रात्रभर तिने नृत्य केले अगदी सकाळी ७ वाजेपर्यंत ती नृत्य करत होती. गौतमीने त्या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली. ते गाणे तिच्यावरच आहे त्यामुळे पूर्ण रात्र लागली ते गाणे चित्रित करण्यासाठी.
चित्रपटातील इतर कलाकारांसोबत कसा अनुभव होता असे विचारले असता त्या म्हणाल्या की गणेश यादव मुलीच्या आत्याचा नवरा आहे,तर प्रणव रावराणे मुलीच्या आत्याचा मुलगा आहे व त्याला त्या मुलीशी लग्न करायचे असते. मुलीच्या आईच्या भूमिकेत चिन्मयी सुमित आहे,जी कोळीण दाखवली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आशयघन व उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'तलास' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागवेल अशी
आशा बाळगू या. दीपा यांना या चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा!


___युवराज अवसरमल
Comments
Add Comment

Actress Chhaya Kadam : 'बिग बॉस'ची ऑफर आली, पण मराठमोळ्या छाया कदम म्हणाल्या 'नको'; कारण ऐकून व्हाल थक्क!

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री छाया कदम (Actress

Jiya Shankar Engagement : अफवांना पूर्णविराम; 'वेड' फेम जिया शंकरने गुपचूप उरकला साखरपुडा; 'मिस्ट्री मॅन'सोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

'बिग बॉस ओटीटी २' (Bigg Boss OTT 2) आणि रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) 'वेड' या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य

Celebrity Brand Valuation Report 2025 शाहरुख खान भारतातील नंबर-१ सेलिब्रिटी ब्रँड; रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकले मागे

क्रोल (Kroll) या जागतिक संस्थेने आपला 'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट २०२५' जाहीर केला आहे. या अहवालानुसार

Nikita Rawal Ranbir Kapoor Controversy : रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ! 'बीफ' वक्तव्यावरून 'रामायण'वर बहिष्काराचे सावट; निकिता रावलची जाहीर माफीची मागणी

मुंबई : दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) आणि निर्माते नमित मल्होत्रा (Namit Malhotra) यांच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ या दोन

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद