आर. के. स्टुडिओनंतर राज कपूर यांचा बंगला विकला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांचा मुंबईतील चेंबूर येथील बंगला विकला गेला आहे. हा बंगला गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीने खरेदी केला आहे. नेमकी किती कोटींची डिल झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, कंपनीशी १०० कोटींचे डिल झाल्याचे बोलले जात आहे.


मुंबईतील चेंबूरमध्ये देवनार फार्म रोडवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या बाजूला राज कपूर यांचा बंगला आहे. याच बंगल्याची विक्री झाली आहे. बंगल्याच्या आधी मे २०१९ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने आर. के. स्टुडिओ खरेदी केला होता. यानंतर आता राज कपूर यांचा हा बंगला विकला गेल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.


दरम्यान, दिवंगत राज कपूर यांचे वारस असलेल्या कपूर कुटुंबाकडून हा बंगला खरेदी करण्यात आल्याची माहिती गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीने दिली आहे. परंतु, हा बंगला किती कोटींना खरेदी केला, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Comments
Add Comment

Bhandup : आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प साकारतोय भांडुप संकुलात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या

BEST : कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वीच मेस्मा लागू, रजा मंजुरीवरही निर्बंध

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती

Vidyavihar Flyover : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; ४५ मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत!

मुंबई: मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या 'विद्याविहार उड्डाणपूल' (ROB) प्रकल्पाचे काम