शैलजा स्वीकारणार का वीणा आणि प्रभासचं नातं?

'हृदयी प्रीत जागते' ही एक तरुण संगीतमय प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. मालिकेचा नायक रॉक बॅड परफॉर्मर आहे, तर नायिका कीर्तन गायिका आहे ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे.


कॉन्सर्टच्या शेवटी प्रभास वीणाला प्रपोझ करतो. पण ती त्याला उत्तर देऊ शकत नाही. वीणा घरी आल्यावर बघते, तर बाबा प्रचंड भडकले आहेत, या सर्व प्रकारामुळे बाबा वीणाचं गाणं बंद करतात. प्रभास वीणाला भेटायला तिच्या घरी येतो. तेव्हा बाबा त्याला निघून जायला सांगतात. प्रभासच्या लक्षात येतं की, वीणाचं ही त्याच्यावर प्रेम आहे. पण बाबांमुळे ती व्यक्त होत नाहीये. बाबा आणि प्रभास यांच्यात मोठा वाद होतो. प्रभास गावात थांबण्याचा निर्णय घेतो. देवाला साकडं घालतो. प्रभासला होणाऱ्या त्रासाने वीणा खूप तळमळते. ही गोष्ट शैलजाला कळते. ती प्रभासला न्यायला संगमनेरला येते. तेव्हा तिला समजतं की, मनोहरचं लग्न झाले असून वीणा ही त्याचीच भाची आहे. शैलजा प्रभासला घेऊन तडकाफडकी निघते. प्रभासची वीणासाठीची तळमळ बघून शैलजा त्यांचं नातं स्वीकारेल की नाकारेल? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं