Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीशिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड

शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देण्याची मागणी करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात त्यांना भेटून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याची तयारी केली होती. या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना पत्र देऊन अधिकृत भेटीसाठी वेळ मागितला होता. तथापि, यावरून त्यांना आजपर्यंत वेळ मिळाला नव्हता. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना निवेदनासाठी दौरा हे योग्य ठिकाण नव्हे असे सांगितले होते. ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून नंतर मुंबई येथे निवेदन द्यावे असे त्यांनी सुचविले होते.

यांना घेतले ताब्यात

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी दुपारी भोकर येथे दाखल झाले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नंदू पाटील, संतोष सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अॅड. शरद माळी, विलास पवार, गजू महाजन, देवा तायडे यांना जळगाव तालुका पोलीस स्टेशनला स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर माजी नगराध्यक्ष तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांना धरणगाव पोलीस स्थानकात बोलवण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -