भाईंदर (अनिकेत देशमुख) : मीरा भाईंदर शहरात महिलांसाठी “वुमन्स टी२० कमिशनर कप २०२३”चे क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यात उत्कृष्ट रित्या फलंदाजी करत स्पर्धा पाहण्याकरता आलेल्या श्रोत्यांचे लक्ष वेधणाऱ्या सिमरन शेखची आता “यूपी वॉरियर्स वुमन्स आयपीएल टिम” मध्ये निवड झाली आहे. मीरा भाईंदर शहरात आयोजीत केलेल्या स्पर्धेत खेळल्यानंतर आत्मविश्वास वाढला असल्याचे सिमरनने सांगितले. स्पर्धेचे मुख्य अतिथी मीरा भाईंदर महानगर पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी स्पर्धेच्या सुरवातीला भाषण करत महिलांचा आत्मविश्वास व मनोबल वाढवले होते.
मिरा भाईंदर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मिरारोड पूर्वच्या कणकीया परिसरात आर. बी. के. शाळेलगत असलेल्या महापालिकेच्या मैदानात प्रथमच महिलांसाठी टी२० क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सिमरन शेख या तरुणीने उत्कृष्ट रित्या खेळत अर्ध शतक बनवले असून ३१ चेंडूत ६८ रण बनवले होते. सिमरनने ०४ सिक्स, ०५ फोर मारून प्रतिस्पर्धीच्या टीमला विचार करण्यास भाग पाडले होते.मीरा भाईंदर शहरात प्रथमच महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत खेळल्या नंतर महिलांचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढला असून आता त्यांच्या सोबतच खेळणाऱ्या सिमरनची निवड “यूपी वॉरियर्स” मध्ये झाल्याने महिलांना एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. कमिशनर चषक 2023 या स्पर्धेमध्ये खेळल्यानंतर सिमरनचा आत्मविश्वास वाढल्यानंतर तीने “प्रेसिडेंट क्लब” मार्फत आयोजित करण्यात आलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेत आणखीन उत्कृष्टरित्या फलंदाजी केली आहे.
सिमरन शेख हिची निवड यूपी वॉरियर्स” मध्ये झाल्या बद्दल मनपा आयुक्त यांनी सिमरन व तिचे कोच विवेक तोडणकर, मिरा भाईंदर क्रिकेट अकॅडमी व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. महिला क्रिकेट करता ज्या सुविधा गरजेच्या आहेत त्या देण्याचा मीरा भाईंदर महानगर पालिका नक्कीच प्रयत्न करेल. मीरा भाईंदर शहरातील जास्तीत जास्त महिला, मुली यांनी इतर संघात सामील होण्या करता प्रयत्न करावा महानगर पालिका त्यांच्या सोबत असल्याचे मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले आहे.आताच्या काळात भारताच्या महिला क्रिकेटने बरेच यश संपादन केले आहे. महिलांच्या क्रिकेटसाठी सुद्धा प्रशासना कडून पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे. भविष्यात मिरा भाईंदर शहरातून उत्कृष्ट महिला क्रिकेटपटू घडवण्यासाठी विविध क्रिकेट अकॅडमी या सातत्याने प्रयत्न करत राहतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…