१४ फेब्रुवारी व्हॅलंटाईन डे की पुलवामा हल्ल्याची चार वर्ष?

मुंबई: १४ फेब्रुवारी तुम्ही व्हॅलेंटाईन डे म्हणून उत्साहात साजरा करणार असाल. अर्थातच हा दिवस इतरांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठीच प्रसिद्ध आहे. या दिवशी अनेकजण प्रेमाचे संदेश देऊन कार्ड, फुले किंवा चॉकलेट एकमेकांना पाठवतात. परंतू १४ फेब्रुवारी म्हणजे फक्त व्हॅलेंटाईन डे इतकीच याची ओळख आहे का?


पुलवामा हल्ला

चार वर्षांपूर्वी, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघाती बॉम्बरने दहशतवादी हल्ला केला होता, ज्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यामुळे परिणामी २०१९ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष झाला होता. या वर्षी 'पुलवामा हल्ल्याला' चौथे वर्ष पूर्ण होत आहे.

Digital Rupee

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आर्थिक साक्षरता सप्ताह


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 2016 पासून दरवर्षी वित्तीय साक्षरता सप्ताह (FLW) साजरा करतो. यामध्ये देशभरात एखाद्या विशिष्ट थीमवर आर्थिक साक्षरता संदेश प्रसारित केला जातो. चालू वर्षासाठी निवडण्यात आलेल्या थीममध्ये आर्थिक बचत आणि नियोजन तसेच डिजिटल वित्तीय सेवांचा योग्य वापर याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.



आंतरराष्ट्रीय पुस्तक आदान-प्रदान दिन


१४ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय पुस्तक आदान-प्रदान दिन म्हणूनही साजरा केला जातो. पुस्तकांचे आदान-प्रदान व वाचनाची आवड वाढविण्याच्या दृष्टिने या दिवसाचे विशेष महत्व आहे.




[caption id="attachment_436830" align="alignnone" width="650"] Library[/caption]

ग्रंथालय प्रेमी दिन


ग्रंथालयप्रेमी, ग्रंथपाल, ग्रंथप्रेमी यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी ग्रंथालय प्रेमी दिन देखील साजरा केला जातो.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवर नौदलासोबत साजरी केली दिवाळी

पणजी : संपूर्ण देश आज दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शूर

उत्पादनांवर ‘ओआरएस’ नाव वापरण्यास मनाई

भारतीय अन्् सुरक्षा आिण मानके प्राधिकरणाचे निर्देश हैदराबाद  : अन्न व्यवसाय संचालकांनी (एफबीओ) त्यांच्या खाद्य

मेंदूची कार्यक्षमता वयाच्या ५५ ते ६० वर्षांदरम्यान असते शिखरावर !

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण स्वत:ला कमकुवत समजतो. आता आपली कार्यशक्ती कमी झाली असे आपल्याला वाटते, पण

चॅट जीपीटीला टक्कर देणार स्वदेशी सर्वम एआय

हिंदीसह १० भारतीय भाषांमध्ये साधणार संवाद नवी दिल्ली  : भारताच्या स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या

मुलगी ऐकत नसेल, तर तिच्या तंगड्या तोडा: प्रज्ञा ठाकूर

भोपाळ : “जर आमच्या मुलीने बिगर हिंदूच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिचे पाय तोडण्यात कोणतीही कसर सोडणार