अनधिकृत रेती उत्खननावर धडक कारवाई

  153

ठाणे: ठाणे व भिवंडी तहसील कार्यालयाच्या पथकाने आज अनधिकृत रेती उत्खननावर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये अंदाजे ५० लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.


मुंब्रा खाडी, कोपर खाडी व भिवंडी लगतच्या खाडीमध्ये गस्तीवर असलेल्या अनधिकृत रेती उत्खननावर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत धडक कारवाई करण्यात येत आहे. आज झालेल्या कारवाईत त्यांनी २ सक्शन पंप आणि २ बार्ज नष्ट केले. तसेच खाडी लगत असलेल्या रेती साठ्यासह 3 कुंड्या नष्ट करण्याची कारवाई केली.


मागील तीन आठवड्यामध्ये प्रशासनाने आठ कारवाया केल्या आहेत. या कारवायांमध्ये ९ बार्ज, ७ सक्शन पंप, २० ब्रास रेतीसाठा, ९ रेतीच्या कुंड्या नष्ट करण्यात आले. सदर साहित्याची एकूण किंमत १.७२ कोटी रुपये आहे. अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहन याच्यावर देखरेख ठेवण्याकरिता अद्ययावत 'महाखनिज प्रणालीचा' वापर करण्यात येत असून त्याद्वारे छाननी करून अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Comments
Add Comment

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत