कंगनाला येतेय नवाजुद्दीनची दया म्हणते, "त्याने आपले सर्वस्व...."

मुंबई: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आणि चित्रपट निर्माती आलिया सिद्दीकी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणते की तिला नवाजुद्दीन सिद्दीकीबाबत फार वाईट वाटतेय. आता नवाजुद्दीन बद्द्ल कंगनाला वाईट वाटायचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिने नवाजुद्दीनवर विश्वासघात केल्याचा आरोप करत त्याला घराबाहेर काढले आहे.



कंगना लिहिते, नवाज साहेबांचा अपमान होताना पाहुन अत्यंत वाईट वाटतंय. त्यांना त्यांच्या घराबाहेर काढण्यात आलं आहे. नवाज यांनी आपलं सर्वस्व कुटुंबाला दिलं, कित्येक वर्षं ते भाड्याच्या ठिकाणी राहिले, टीडब्ल्यूएस या त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटसाठी ते रिक्षाने गेले. गेल्या वर्षीच त्यांनी हा बंगला विकत घेतला होता आणि आता त्याची माजी पत्नी त्यावर हक्क सांगायला आली.



तिने असेही लिहिले की, " नवाज यांनी आजपर्यंत जे काही कमावले, ते त्यांनी आपल्या भावांना दिले, त्यांनी त्यांच्या पत्नीला अनेक वर्षांपूर्वी घटस्फोट दिला होता, ते मुलांचा एकत्र सांभाळ करत होते. ती दुबईत मुलांसोबत राहत होती, त्याने तिच्यासाठी मुंबईत फ्लॅटही विकत घेतला होता... आणि नुकताच त्याने त्याच्या आईसाठी एक बंगला खरेदी केला होता, त्याने माझ्याकडून होम डिझायनिंगच्या अनेक टिप्स घेतल्या, आम्ही खूप आनंदी होतो, आम्ही एकत्र या घरात हाऊस वॉर्मिंग पार्टीही केली होती ."



काय आहे नेमकं प्रकरण?


अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात सुरू झालेला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. दरम्यान, आलियाने १० फेब्रुवारीला नवाजचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यामध्ये ती घराच्या आत आहे, तर नवाज गेटजवळ उभा राहून तिच्याशी बोलत आहे. व्हिडिओमध्ये आलिया नवजावर संतापलेली दिसत आहे.





आलियाने नवाजविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून, त्यामध्ये तिने आपल्या मुलाची आणि नवाजची डीएनए चाचणी करावी, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी नवाजच्या आईने दावा केला होता की, तो मुलगा नवाजचा नाही. व्हिडिओ शेअर करताना आलियाने एक लांबलचक नोट लिहित नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Comments
Add Comment

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला ३० वर्षे पूर्ण

शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट