
मुंबई : सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू आहे. सात दिवस प्रेमाचे वेगवेगळे प्रकार या आठवड्यात साजरे केले जातात. तर आज प्रॉमिस डे आहे. या दिवशी अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला वचन देत असतात. प्रॉमिस डे च्या दिवशी आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन अनेकजण देत असतात.
आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला आयुष्यभर साथ देण्याचे वचन द्यायचे असते. पण हल्लीच्या इंटरनेटच्या युगात लोक दोन दिवस एकमेकांसोबत धड राहात नाहीत. मग आयुष्यभर काय राहणार? कित्येक जण गेल्या वर्षीचा व्हॅलेंटाईन कोणा दुसऱ्यासोबत साजरा करत होते. अन् यावेळी त्यांच्यासोबत कोणी दुसरच आहे. याच पार्श्वभूमीवर काही जबराट मीम्स व्हायरल होत आहेत.
अनेकजण आपल्या जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण करत नाहीत. तर अनेकजणांचे वचन पूर्ण होते. पण यासंदर्भातील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मीम्स पाहून आपल्याला हसू आवरणार नाही. या मीम्सवर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.सबसे ज़्यादा #तोड़ा जाने वाला #प्रॉमिस 🫣🤭😂😂#promiseday pic.twitter.com/pSkpO7xaVx
— रूही शर्मा. #चंबल की रानी 👸 (@ruhisarma121) February 11, 2023
सोशल मीडियावर प्रॉमिस डे संदर्भात अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. अनेकांनी लहानपणी आपल्या आईने मारताना आपल्याला दिलेले प्रॉमिस आठवले आहे. जेव्हा आपण लहानपणी काहीतरी चुक करतो आणि आई आपल्याला मारते त्यावेळी आपण लपून बसतो. त्यानंतर आई आपल्याला म्हणते, "मारत नाही बाहेर ये..." हे सर्वांत मोठे आणि खतरनाक प्रॉमिस असायचे.#promiseday #promiseday2023 She: I love you. He: Khao meri kasam? She: pic.twitter.com/Nus1WrXfTB
— Siddhesh Pitale (@pitale_siddhesh) February 11, 2023
Ghandy से Gandhi कैसे बने वो भी राज अब बाहर आ गया.... #promiseday2023 pic.twitter.com/jFmyDQEx6l
— Bhagyashri (@Bhagyashrisep29) February 11, 2023