भोपाळ, विशेष प्रतिनिधी: खेलो इंडिया युथ गेम्समध्ये कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे स्वप्न आज अजय कापडे व सुमितकुमार भारस्कर या मल्लांनी साकार केले. त्यांनी अनुक्रमे फ्री स्टाईल व ग्रीको रोमन विभागात ही कामगिरी केली
फ्री स्टाईल मधील ६५ किलो वजनी गटात अजय याने पहिल्याच कुस्तीत हरियाणाच्या विकास यादव याचा १६-६ असा पराभव केला. विशेष म्हणजे ४-६ अशा पिछाडीवरून त्याने सातत्याने वेगवेगळे डावपेच टाकत सलग बारा गुण जिंकले आणि विजयश्री खेचून आणली. ही लढत जिंकल्यानंतर अजय याने नंतरच्या फेरीत हरियाणाच्या अतुल कुमार याला ७-२ ने पराभूत केले. उपांत्य फेरीत त्याने तेलंगणाच्या निखिल कुमार याचा ५-४ असा पराभव केला. अंतिम फेरीत अजयपुढे दिल्लीच्या आकाश कुमार याचे आव्हान होते. पहिल्या दोन मिनिटाच्या फेरीत त्याने ३-१ अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्याच्यासाठी निर्णय ठरली.
ग्रीको रोमन विभागातील ७१ किलो गटात सुमित कुमार भारस्कर याने पंजाबच्या मनजोत सिंग याचा ११-७ असा पराभव केला. सुरुवातीला त्याच्याकडे ३-१ अशी आघाडी होती. नंतर मात्र दोन्ही खेळाडूंनी आक्रमक डावपेचांचा उपयोग केला. त्यामध्ये सुमित याने यश संपादन केले. बीडचा हा खेळाडू पुण्यात अमोल बुचडे यांच्याकडे सराव करीत आहे. सुमितकुमार याने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेश बादल चौहान याला ६-४ असे पराभूत केले. पहिल्या टप्प्यात त्याने ३-१ अशी आघाडी घेतली होती.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…