मनसे-भीम आर्मीच्या पदाधिका-यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

  151

मनसेचा माजी विभाग अध्यक्ष आणि भीम आर्मीच्या जिल्हाप्रमुखाचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश


मुंबई : मनसेचे ठाणे शहरातील माजी विभाग अध्यक्ष व कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या २०१९ च्या निवडणुकीतील उमेदवार महेश कदम व भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख नितीन मधुकर वाघमारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये आज प्रवेश केला. भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर उपस्थित होते.


महेश कदम यांनी मनसेबरोबरच स्वामी फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य केले आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच कदम यांनी २०१७ मधील महापालिकेची निवडणूकही लढविली होती. तर भीम आर्मीचे जिल्हाप्रमुख नितीन वाघमारे यांनाही मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. या दोघांबरोबरच शेकडो कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाची ठाण्यातील संघटनात्मक फळी आणखी मजबूत झाली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या काही तासांपूर्वी माझा भाजपात प्रवेश होत आहे. याबद्दल मी भाग्यवान आहे. सध्याच्या परिस्थितीत हिंदूत्वाचा केंद्रबिंदू हा भाजपाच आहे. ते लक्षात घेऊन भाजपामध्ये सहभागी झालो, अशी प्रतिक्रिया महेश कदम यांनी व्यक्त केली. यावेळी महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, भाजपाचे प्रदेश सचिव संदीप लेले, माजी नगरसेवक सुनेश जोशी, ठाणे परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, भाजपाचे शहर सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे आदींची उपस्थिती होती.

Comments
Add Comment

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र