भिवंडीत गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदन व स्वागत

  95

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पडघा विभागात तथागत भगवान गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदन व आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खु संघ थायलंड यांची धम्मपद यात्रा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तसेच रविवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांच्या वतीने पडघा टोलनाक्या जवळील मुंबई-नाशिक हायवे जवळील गोपाळास हॉटेल येथे होणार आहे.


यावेळी पडघा विभागातील नागरिकांना तथागत भगवान बुध्द यांच्या अस्थिधातू कलशाचे वंदन करता येईल. यावेळी थायलंड येथील ११० बौध्द भिक्खू संघ, धम्मपद यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. थायलंड येथील बौध्द भिक्खू संघाच्या वतीने उपस्थित नागरिकांना धम्मदेसना मिळणार आहे. पडघा व भिवंडी परिसरातील नागरिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांचा वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट!

सात तालुक्यांत मुसळधार पाऊस पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये वसई वगळता इतर सात तालुक्यांमध्ये शुक्रवारी

पनवेल-कल्याण रेल्वे दिवामार्गे करण्याची गरज

डोंबिवली : पेण-पनवेल-कल्याण रेल्वे दिवा मार्गे सुरू करण्याची नितांत गरज आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर लाखो

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

सार्वजनिक वाहनांमध्ये बसवणार पॅनिक बटण, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): सार्वजनिक प्रवासी वाहनांमधील महिलांच्या सुरक्षेचा मु्द्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे