Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीरेल्वे प्रवासी आता हॉटेलमधून व्हॉट्स ॲपवरच खाद्यपदार्थ मागवू...

रेल्वे प्रवासी आता हॉटेलमधून व्हॉट्स ॲपवरच खाद्यपदार्थ मागवू…

भारतीय रेल्वेने सुरू केली नवी सेवा

नवी दिल्‍ली (वृत्तसंस्था): रेल्वे प्रवासी आता व्हॉट्स ॲपवरच आवडत्या रेस्टॉरंटमधील आवडते खाद्यपदार्थ मागवू शकतात. आयआरसीटीसीने ही ई-खानपान सेवा सुरू केली आहे. आयआरसीटीसीच्या नवीन संकेतस्थळासह, ई-कॅटरिंग ॲप ‘फूड ऑन ट्रॅक’ द्वारेही या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो.

सुरुवातीला, व्हॉट्सॲपद्वारे ई-खानपान सेवांची दोन टप्प्यांत अंमलबजावणी करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात www.ecatering.irctc.co.in या वेबसाईटवर गेल्यावर. ई-तिकीट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी व्हॉट्स ॲपवर संदेश पाठवला जाईल.

तसेच दुसरा पर्याय असलेले ई-कॅटरिंग ॲप डाउनलोड न करताही या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. थेट आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन रेल्वेस्थानकाच्या मार्गावर उपलब्ध असलेल्या त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांची ऑर्डर देता येईल. तुम्ही स्नॅक्स, ज्यूस, बिर्याणी, थाळी, रोटी, पराठा, टिफिन, केक, बर्गर इत्यादी ऑर्डर करू शकता.

सुरुवातीला, निवडक रेल्वेगाड्यांमध्ये ही व्हाट्स ॲप संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी +91-8750001323 हा व्हॉट्स ॲप क्रमांक सुरू करण्यात आला आहे. ग्राहकांचे अभिप्राय आणि सूचनांच्या आधारे, रेल्वे इतर गाड्यांमध्येही ही सुविधा सुरु करण्यात येईल, असे रेल्वेमंत्रालयाने नमुद केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फुलांचा सुगंध…

प्रियाची झोप…

सरपंच आजी…

उठाबशा

- Advertisment -