वर्धा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले असून आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या साहित्यनगरीमध्ये वर्धा शहरात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात आयोजित केलेल्या या साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथदिंडीने झाली. मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच गुरुदेव सेवा मंडळानी हरिपाठ आणि लेझीमचे पथक सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
ज्येष्ठ विचारवंत-लेखक न्या. नरेंद्र चपळगावकर यंदा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील. मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याकडून ते अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्याचबरोबर या साहित्य संमेलनासाठी वर्ध्यात येणाऱ्या साहित्य संमेलनासाठी उद्घाटन आणि समारोपाला येणाऱ्या पाहुण्यांचे प्रत्यक्ष सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत केले जाणार आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…