शिवसेनाभवनजवळ कार पेटली...

मुंबई: दादरमधील शिवसेना भवनासमोरील रस्त्यावर एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने काही काळ खळबळ उडाली. दुपारच्या सुमारास ही आग लागली. संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीला आग लागल्याने काही काळ येथील वाहतूक थांबवण्यात आली होती.


ज्या कारला आग लागली ती एक खासगी वॅगनआर गाडी होती. कोहिनूर स्वेअरमधून पाण्याचा मारा करुन आग विझवण्याचा प्रयत्न काही मिनिटांनंतर सुरक्षारक्षकांनी केला. दरम्यानच्या काळात आजूबाजूची दुकानं बंद करण्यात आली. अग्निशमन दलाची गाडी स्थानिकांनी आग विझवेपर्यंत पोहचलेली नव्हती.



आग विझवण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून कुलिंग ऑप्रेशन सुरु करण्यात आलं आहे. गाडीमध्ये इतर काही ज्वलनशील पदार्थ नाहीत ना, या गाडीला पुन्हा आग लागण्याची शक्यता नाही ना यासंदर्भातील चाचपणी अग्निशमन दलाने केली.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती