एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा


पुणे : एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर अन्य मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आहे.


यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आज पुन्हा रस्त्यावर आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याआधी १३ जानेवारीला देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.


आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. यावेळी फडणवीस यांनी हा विषय आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल आणि निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री फडणवीसांंचा निर्णय; धडाकेबाज IAS अधिकाऱ्याची नागपूरमधून बदली

नागपूर: नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. अभिजीत चौधरी यांच्यावर पुणे महानगर

पुणे मेट्रोचा विस्तार ठरला; विमानतळापर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल नवा मार्ग

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत मेट्रो सेवा आता थेट लोहगाव विमानतळाच्या दारात पोहोचणार आहे.

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.