वाडा : दैनिक प्रहारचे कुडुस येथील पत्रकार अनंता दुबेले यांच्या मातोश्री सरस्वती सिताराम दुबेले यांचे वयाच्या ९०व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेस राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांचे दशक्रिया विधी ८ फेब्रुवारी रोजी तिळसा येथे तर उत्तरकार्य विधी मोहोट्याचा पाडा येथे राहत्या घरी होणार असल्याची माहिती दुबेले यांच्या निकटवर्तीयांनी दिली.