आसाराम आता पुरता अडकला, आणखी एका बलात्कार प्रकरणात दोषी

मुंबई: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित संत आसाराम बापूच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. आसाराम बापू हा आणखी एका बलात्काराच्या प्रकरणाता दोषी आढळला आहे. गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून उद्या आसाराम बापूला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.


या आधी केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी जोधपूर येथील तुरुंगात आसाराम बापू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टात त्याने जामीन अर्जही दाखल केला होता. मात्र, कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला होता.



काय आहे प्रकरण?


२०१३ मध्ये सूरतमधील एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर लावण्यात आला होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या आरोपी होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी असल्याचे जाहीर केले. मात्र, शिक्षा उद्या, मंगळवारी सुनावणार असल्याचे जाहीर केले.

Comments
Add Comment

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी

Major Diplomatic Twist India-Nepal Meeting : नेपाळचा भारताकडे स्पष्ट कल! दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीनंतर चीनची चिंता वाढली

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये शनिवारी भारत आणि नेपाळ यांच्यात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

KCET UGCET निकाल २०२६ जाहीर : यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचा डंका; मुलांपेक्षा तब्बल ४१ हजार अधिक मुलींची परीक्षेला उपस्थिती

बंगळुरू : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून (KEA) घेण्यात आलेल्या बहुचर्चित 'कर्नाटक सामायिक प्रवेश परीक्षेचा' (KCET UGCET 2026)