मुरबाड: प्रत्येक स्त्रीने तिच्या करिअरमध्ये हार न मानता ताकदीने लढा दिला पाहिजे असा स्फुर्तिदायक अन् प्रेमळ सल्ला ‘मराठी बिग बॉक्स’ व रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने दिला. मुरबाड समाज हॉल येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दिव्य हळदीकुंकू समारंभाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, मी सुद्धा ‘मराठी बिग बॉक्स’ मध्ये काम करताना ठरवलं होतं की कधीही हार मानायची नाही, त्यामुळे तुम्हीही हार मानू नका असे आवाहन अपुर्वा नेमळेकर यांनी केले. सभागृहातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती पाहून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला. या हळदी कुंकू कार्यक्रमात जवळपास बाराशे महिलांना बाराशे साड्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी व्यासपीठावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील, पुष्पलता पाटील, ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, डॉ. भारती बोटे, शुभांगी पवार, उपजिल्हा प्रमुख रामभाऊ दळवी, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार, तालुका प्रमुख कांतिलाल कंटे, पंचायत सदस्य अनिल देसले, तालुका सचिव प्रा. धनाजी दळवी, नगरसेवक विनोद नार्वेकर, अक्षय रोठे, महिला संघटक रेखा ईसामे, जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावथे॔, पंचायत समिती सदस्य पद्मा पवार, योगिता विशे, त्यांच्यासह या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या समारंभात जवळपास बाराशे महिलांनी सहभाग घेतला होता.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…