भाडे व वीज बिल न भरल्याने शिवसेना भवन सोडावे लागले

ठाकरे गटाची स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपड


नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दणका दिल्यानंतर स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपड करीत असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाला नागपूरमधील स्वत:च्या हक्काचे शिवसेना भवनसुद्धा वाचवता आले नाही. वर्षभराचे भाडे आणि वीज बिल थकवल्याने गणेशपेठ येथील कार्यालय घरमालकाने रिकामे करून घेतले. ही नागपूरच्या पदाधिकाऱ्यांची नाचक्कीच मानली जाते.


शिवसेना कोणाची असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणावर एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेने दावा केला आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली आहे.


सतीश हरडे जिल्हा प्रमुख असताना २०१४ मध्ये गणेशपेठ येथे शिवसेना भवनासाठी कार्यालय भाड्याने घेण्यात आले होते. २० हजार रुपये भाडे आणि इलेक्ट्रिक बिल सेनेला भरायचे होते. तीन ते चार वर्षे कार्यालय सुरू होते. महापालिकेच्या निवडणुकीचे एबी फॉर्मचे वाटप याच कार्यालयातून झाले होते.


प्रकाश जाधव जिल्हा प्रमुख झाल्यानंतर सात ते आठ महिने कार्यालयातून कामकाज चालत होते. त्यानंतर शिवसेनेची कार्यकारिणी बदलली आणि शिवसेना भवनातही कोणी फिरकेनासे झाले. त्यामुळे भाडे थकले. शेवटी जागा मालक किशोर राय यांनी कार्यालय रिकामे करायला लावले. ही जागा दुसऱ्याला भाड्यानेसुद्धा देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून

शनिवार वाड्यात नमाज पठण? ऐन दिवाळीत पुण्यात वादाची ठिणगी !

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना