'आलंय माझ्या राशीला’चं पोस्टर राज ठाकरेंच्या हस्ते प्रदर्शित

मुंबई: आपल्या राशीचक्रातल्या बारा राशी या अतिशय मनोरंजक आहेत. प्रत्येक राशीचं स्वभाव वैशिष्ट्य, सौंदर्य आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या बारा राशींचा आणि मानवी भावभावनांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे या विविध राशींच्या व्यक्तिरेखांना अभ्यासणे हे सुद्धा खूपच मनोरंजक आहे. या सगळ्याचे धमाल चित्रण असलेला ‘आलंय माझ्या राशीला’ हा मराठी चित्रपट १० फेब्रुवारीला आपल्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेसृष्टीच्या अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे. सुप्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर चित्रपटाचे निर्माते आहेत.


चित्रपटाच्या वेगळ्या विषयाचे कौतुक करीत राजसाहेब ठाकरे यांनी चित्रपटाला खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रपटातील अभिनेत्री निर्मिती सावंत, निर्माते आनंद पिंपळकर, सहनिर्माते दिलीप जाधव, युवा अभिनेता प्रणव पिंपळकर, दिग्दर्शक अजित शिरोळे उपस्थित होते.


‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर, सिद्धार्थ खिरीड यांच्या भूमिका आहेत. अभिनेता प्रणव पिंपळकर या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करतोय.


‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. सहनिर्माते दिलीप जाधव आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर ओंकार माने, प्रणव पिंपळकर आहेत. गीते गुरू ठाकूर, अभय इनामदार, कौतुक शिरोडकर यांनी लिहिली आहेत. छायांकन कृष्णा सोरेन यांचे तर संकलन विजय खोचीकर यांचे आहे. पार्श्वसंगीत मिलिंद मोरे यांचे आहे. वेशभूषा मैत्रीयी शेखर आणि संगीता तिवारी यांची आहे. ध्वनी अशोक झुरुंगे, तर नृत्य सुजितकुमार, नरेंद्र पंडित, प्रीतम पाटील यांचे आहे. साहसदृश्ये अकबर शरीफ, तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील यांनी सांभाळली आहे. व्हीएफएक्सची जबाबदारी श्रेयस केदारी, रितेश पवार यांनी सांभाळली आहे.

Comments
Add Comment

थिएटर नाही; तर वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहातच लावले चित्रपटाचे शो!

‘कुर्ला टू वेंगुर्ला’चे सर्व शोज हाऊसफुल्ल माती आणि नाती जोडणारा सिनेमा असे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, तो

अभिनेते अजय पूरकर साकारणार खलनायक

नायकाप्रमाणे क्रूर खलनायकही चित्रपटांत गाजलेत! याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले कलाकार आता नकारात्मक पात्र

तीन दिवसांचा माणिक स्वर महोत्सव

महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका, पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी (२०२५–२०२६) वर्षानिमित्ताने देशभरात

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा कल

'बालिका वधू'ची आनंदी विवाहबंधनात! लग्नानंतर 'सिंदूर-मंगळसूत्र' लूकमध्ये पतीसोबत दिसली

टीव्ही अभिनेत्री अविका गोर आणि मिलिंद चंदवाणी अडकले विवाहबंधनात; राष्ट्रीय टीव्हीवर होणार प्रसारण मुंबई:

'फिर से गुड न्यूज' भारती आणि हर्षने खास पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी!

मुंबई : आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि