ठाणे : वार्षिक परीक्षेआधीच्या तणावातून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला होता. ठाण्यातील कोपरी येथील जीवनज्योती शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत ऑनलाईनद्वारे भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी हा कार्यक्रम पाहिला.
यावेळी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरतजी चव्हाण, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ, विलास निकम, शाळेचे सचिन डेमला आदी उपस्थित होते.