Thursday, July 10, 2025

आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त वाड्यात वैद्यकीय शिबीर

आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त वाड्यात वैद्यकीय शिबीर

वाडा : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त वाडा तालुक्यातील परळी नाका येथे वाडा नगर पंचायतीचे माजी उपाध्यक्ष संदीप गणोरे यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते.


डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व एस. एम. बी. टी. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिबिराचे उदघाटन आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी पालघर जिल्हा संघटक वसंत चव्हाण, जिल्हा संघटक महिला आघाडी वैष्णवी रहाणे, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे जिल्हा संघटक निकी नाईक, वाडा पंचायत समिती उपसभापती सागर ठाकरे, एस. एम. बी. टी. हॉस्पिटलचे डॉ. सविनय पाटील, पल्लवी परदेशी, रोहिणी रोंगटे, गणेश बिन्नर, नरेंद्र चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment