भारत - पाकिस्तान अणुयुद्ध कोणी रोखले?

सुषमा स्वराज यांचा एक फोन आला आणि पाकिस्तानचा भारतावर अणुबॉम्ब टाकायचा डाव पुरता फसला असा खळबळजनक दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी केला आहे. स्वराज यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अनर्थ घडला असता असा गौप्यस्फोट पॉम्पियो यांनी केला आहे.


दरम्यान पॉम्पियो यांच्या या दाव्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर पुन्हा एकदा समोर आला आहे. पॉम्पियो यांनी ‘नेव्हर गिव्ह अ‍ॅन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या पुस्तकात याची माहिती दिली आहे.
ते लिहितात- २७-२८ फेब्रुवारी २०१९ हे दोन दिवस मी अमेरिका – उत्तर कोरिया शिखर संमेलनमध्ये होतो. त्याचवेळी आम्हाला सुषमा स्वराज यांनी एक माहिती दिली. भारत - पाकिस्तान अणुयुद्धाच्या दिशेने वाटचाल करत होते. ते संकट टाळण्यासाठी आम्ही रात्रभर जागे होतो. दिल्ली आणि इस्लामाबादमधील संबंधितांशी चर्चा करत होतो. जगाला त्या रात्रीविषयी कळले पाहीजे.



सुषमा स्वराज यांनी नेमके काय केले?


या प्रसंगाची आठवण नमुद करताना पॉम्पियो यांनी सुरुवातील पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. ज्यामध्ये भारताच्या ४० जवानांना वीरगती प्राप्त झाली होती. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. या स्ट्राईकनंतर पाकिस्तानची झोप उडाली. त्यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या बदल्यात अणुबॉम्ब टाकण्याचा प्लान केला. पॉम्पियो म्हणाले की, भारताच्या तत्कालिन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला झोपेतून उठविले होते. पाकिस्तानने हल्ला केल्यास प्रतिहल्ल्याची भारतही सज्ज होत असल्याचे स्वराज यांनी सांगितल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.


पॉम्पियो यांना तात्काळ अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर पाकिस्तानचे सेनाप्रमूख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशीही चर्चा केली. बाजवा यांनी सुरुवातील अणुयुद्धाची शक्यता फेटाळून लावली. पॉम्पियो यांनी त्यांची समजूत काढली आणि भारताला माहिती दिली की पाकिस्तान अणुयुद्धाची तयारी करत नाही.

Comments
Add Comment

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रगीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या

Agni-5 Mk2 : अग्नी-5 Mk2 मध्ये मोठे अपग्रेड; वजन 20 टक्क्यांनी घटल्याचा दावा, वाढणार मारक क्षमता

नवी दिल्ली : भारत आपल्या संरक्षण क्षमतेत सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे. ब्रह्मोस आणि अग्नी

Justice Yashwant Varma : न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध; संसदेत चौकशी समितीचा अहवाल सादर

नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी