मुंबई : कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आणि पेन ड्राईव्ह हाती आल्याचे व हे सगळे सोमवारी जाहीर करणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत केले आहे.
आपण कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह ठेवून गेल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईकरांची लूट कोणी आणि कशी केली याची माहिती तसेच बँक खात्यांचे पुरावेही यामध्ये असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.
कशा पद्धतीने मुंबईची लूट करण्यात आली हे मी उघड करणार आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीकडे करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
याचबरोबर संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे वीरप्पन गॅंगच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला संदिप देशपांडे यांनी लगावला आहे. वीरप्पन गॅंगचा कोरोना काळातला मोठा घोटाळा पुराव्यासहीत सोमवारी दिनांक २३ जानेवारीला उघड करणार असल्याचे देशपांडेंनी म्हटले आहे.
त्यामुळे आता सोमवारी संदिप देशपांडे नेमकी काय भूमिका मांडणार? त्यांच्याकडे असणारे पुरावे नेमके काय असणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल…
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…