मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर आता शिवसेना नक्की कोणाची आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण सुरू आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज अंतिम सुनावणी पार पडली. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे कोणत्या गटाकडे जाणार हे अद्याप अधांतरीच राहिले आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी या दोन्ही गटांमध्ये चिन्हावरुन संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांसाठी तात्पुरती चिन्हं बहाल केली तसेच दोन्ही गटांना वेगळी नावंही दिली. त्यानुसार, उद्धव ठाकरे गटाचे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि चिन्ह ‘मशाल’ देण्यात आले. तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ‘ढाल-तलावर’ हे चिन्ह देण्यात आले.
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…