Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीSHOCKING VIDEO : आगीमुळे बाल्कनीत अडकलेली मुलगी जिवंत जळाली

SHOCKING VIDEO : आगीमुळे बाल्कनीत अडकलेली मुलगी जिवंत जळाली

अहमदाबाद : अहमदाबादच्या शाहीबाग भागातील ११ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शनिवारी आग लागली. (SHOCKING VIDEO) या अपघातात एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ती बाल्कनीत अडकली होती आणि आपला जीव वाचवण्यासाठी लोकांकडे विनवणी करत होती, पण तिला वाचवता आले नाही. या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत.

कुटुंबातील चार जणांचा जीव वाचला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद फायर ब्रिगेडला सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी कॉल आला. शाहीबाग येथील गिरधर नगर सर्कलजवळ असलेल्या ऑर्किड ग्रीन फ्लॅटच्या सातव्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.

दरम्यान, आग लागली तेव्हा फ्लॅटमध्ये पाच जण होते. १५ वर्षीय प्रांजल बाल्कनीत अडकली होती. तर इतर चौघे फ्लॅटमध्ये होते ते बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर प्रांजल खोलीत अडकली. नंतर ती बाल्कनीकडे गेली आणि जीव वाचवण्याची विनंती करू लागली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आठच्या सुमारास बचावकार्य सुरू झाले. अग्निशमन दलाचे एक पथक आठव्या मजल्यावर पोहोचले. तिथून दोरी बांधून दोन जण त्या बाल्कनीत पोहोचले. त्यांनी मुलीला बाहेर काढले. यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती १०० टक्के भाजली होती. यामुळे तिचा मृत्यू झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -