...तर रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे संजय राऊतला चप्पलेने मारतील : नारायण राणे

मुंबई : शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊतने घेतलेली आहे. संजय राऊत हा राजकारणातला जोकर आहे, अशी घणाघाती टीका करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे.


उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याबाबत संजय राऊत जे बोलायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. त्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरे संजयला चप्पलेने झोडपतील, अशी जहरी टीका राणे यांनी केली. तसेच संजय राऊत जिथे बोलावतील तिथे सुरक्षा सोडून यायला तयार आहे, असेही जाहीर आव्हान त्यांनी राऊत यांना दिले आहे.


शिवसेनेच्या १९ जून १९६६ पासून पहिल्या ४० वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेली नाही. ती संजय राऊतने घेतलेली आहे. आज त्याला शिवसेना संपवल्याचा आनंद होत आहे. ५६ आमदार होते आता १२ पण राहिलेले नाही. संजय राऊतचे एकतरी विकासात्मक काम सांगा. संपादक म्हणून त्यांनी लिहिलेला एकतरी बौद्धीक लेख दाखवा. लेखातून शिव्या देण्यापलिकडे काही काम तो करत नाही.


एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. कशासाठी माहित आहे का? मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत राज्यसभेत येऊन माझ्या बाजूला बसायचा आणि उद्धव ठाकरे तसेच रश्मी ठाकरे यांच्याबाबत जे काही सांगायचा ना ते उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. त्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या ऐकून रश्मी आणि उद्धव ठाकरे यांनी संजयला चप्पलेने नाही मारलं तर मला विचारा, अशी टीका राणे यांनी केली.



'संजयने ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो संपला समजा'


"शिवसेना संपवण्याची सुपारी मी नाही तर संजय राऊतने घेतली आहे. शिवसेना संपवली याचा त्याला आनंद होत आहे," असा दावा नारायण राणे यांनी केला. "हा शिवसेना वाढवणारा नाही संपवणारा आहे. संजयने ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो संपला समजा. असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे तुम्ही संजय राऊतबद्दल विचारु नका, असे राणे म्हणाले. संजय राऊत मातोश्रीला सुरुंग लावणारा विष असल्याची टीका राणे यांनी केली.



जिथे बोलावशील तिथे सुरक्षा सोडून यायला तयार


जर तुम्ही धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर नारायण राणे म्हणाले की, "मी मला सुरक्षा मागितलेली नाही. मला आज नाही तर १९९० पासून संरक्षण आहे. तेव्हा तो शिवसेनेत नव्हता. तो शिवसेनेविरुद्ध लोकप्रभामध्ये लेख लिहित होता. पण आज सांगतो संजय राऊत, तू जिथे बोलावशील तिथे मी सर्व सुरक्षा सोडून यायला तयार आहे."



'संजय राऊत हे राजकारणातले जोकर'


आजच्या राजकारणाला संजय राऊत हा जोकर आहे. शिव्या घालण्यापलीकडे तो काही करत नाही. त्याने सामाजिक, आर्थिक, धार्मिक असे कोणतेच काम केलेले नाही, असे नारायण राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जलद कारवाईमुळे कल्याण स्टेशनवर जीव वाचला

 मुंबई :  मध्य रेल्वेच्या सतर्क स्टेशन कर्मचाऱ्यांनी आज कल्याण स्टेशनवर एका संभाव्य दुर्घटनेला यशस्वीरित्या

Divya Dakshin Yatra : IRCTC सोबत भारताच्या आध्यात्मिक वारशाचा अनुभव; भारत गौरव पर्यटन ट्रेन 26 मे 2026 रोजी नागपूरहून प्रस्थान करणार

मुंबई : Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) तर्फे 11 रात्री / 12 दिवसांची विशेष “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटन ट्रेनद्वारे

Tourism Minister Shambhuraj Desai : अजिंठा परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास साधणार

सिल्लोड-सोयगावमधील पर्यटन प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबईत आढावा बैठक मुंबई : जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या

Former IPS officer Meera Borwankar : 'त्या' निव्वळ अफवा, मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीवर सरकारचं स्पष्टीकरण

Maharashtra State Commission for Women : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Chief Minister's Medical Fund : 'मुख्यमंत्री वैद्यकीय निधी'ने दाखवला माणुसकीचा मार्ग!

मृत्यूच्या दाढेतून परतला महाडचा सुपुत्र; कॅन्सरग्रस्त रुग्णाला तब्बल १५ लाखांची मदत मुंबई : कर्करोगासारख्या

Minister Nitesh Rane : आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ पनवेल येथे उभारणार – मंत्री नितेश राणे

मुंबई : पनवेल येथे प्रस्तावित ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा