सर्व शिक्षण मराठीतून करणार : देवेंद्र फडणवीस

  54

मुंबई : मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इंजिनिअरिंग आणि इतर सर्व प्रकारचे शिक्षणही मराठी भाषेतून करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. येत्या काळात सर्व शिक्षण हे मराठीत करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.


मुंबईत ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.


फडणवीस म्हणाले, "आम्ही आता इंजिनिअरिंग किंवा इतर शिक्षणदेखील मराठी भाषेतून करणार आहोत. मराठी भाषा ही ज्ञान भाषा करणार आहोत. मराठी नाट्य संस्कृतीची प्रगल्भता इतर कशात पाहता येत नाही. जगातील आयटीमध्ये मराठी माणसाचा बोलबाला आहे. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात पुढे होता. आता त्याला आणखी पुढे आणण्याचा प्रयत्न येत्या काळात करणार आहे. जगातील प्रत्येक खंडातील लोक या संमेलनात उपस्थित आहेत. मराठी भाषेला समृद्ध करण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावकरांनी केले. भारतीय भाषा जगवण्यासाठी ज्ञान भाषेत रुपांतर केले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखले आहे.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक