मुकेश अंबानी आता चॉकलेट विकणार!

मुंबई : देशातील दुसरे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या हाती आणखी एक कंपनी येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एफएमजीसी युनिट रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड लोटस चॉकलेटमध्ये मोठा हिस्सा खरेदी करणार आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने लोटस चॉकलेट्सच्या प्रवर्तकांसह एक करार केला आहे. कंपनी चॉकलेट, कोको उत्पादने आणि कोको डेरिव्हेटिव्ह्ज तयार करते. शेअर खरेदी करारांतर्गत, रिलायन्स कंझ्युमरने लोटस चॉकलेटच्या पेड-अप शेअर कॅपिटलपैकी ७७ टक्के हिस्सा संपादन केला आहे.


कंपनीचे प्रवर्तक प्रकाश पेराजे पै आणि अनंत पेराजे पै यांच्याकडून शेअर बाजारात खरेदी केली जाणार आहे. यानंतर, रिलायन्स कंपनीतील २६ टक्के स्टेक घेण्यासाठी खुली ऑफर देईल. रिलायन्स या कंपनीतील ५१ टक्के हिस्सा ७४ कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. ही खरेदी ११३ रुपये प्रति शेअर या दराने करण्यात आली आहे. रिलायन्स कंझ्युमर ही रिलायन्स रिटेलची उपकंपनी आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत रिलायन्स रिटेलचा एकत्रित निव्वळ नफा ३६ टक्क्यांनी वाढून २,३०५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने अलीकडेच आपला ब्रँड इंडिपेंडन्स लाँच केला आहे. सध्या ते गुजरातमधील अहमदाबाद येथे लाँच करण्यात आले आहे. नंतर ते देशभर सुरू करण्याची योजना आहे. रिलायन्स रिटेलच्या प्रमुख मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी या आहेत. खाद्यतेल, डाळी, तृणधान्ये, पॅकेज्ड फूड आणि इतर दैनंदिन गरजेच्या उत्पादनांसह इतर परवडणारी उत्पादने इंडिपेंडन्स एफएमसीजी ब्रँड अंतर्गत सादर केली जातील, अशी ईशा अंबानी यांची योजना आहे.

Comments
Add Comment

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची