नवी दिल्ली : रंग लागलेल्या, फाटलेल्या आणि लिहीलेल्या नोटा स्विकारण्यास सर्वजण नकार देतात. आपणही कोणाकडूनही नोट घेताना फाटकी तर नाही ना, त्यावर काही लिहीलेले नाही ना, याची पूर्ण खात्री करतो. आपल्याकडे असलेली अशी फाटकी नोट देखील अनेक दुकानदार घेत नाहीत. चांगली नोट द्या, अशी मागणी दुकानदार देखील आपल्याकडे करतो. मग फाटलेल्या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न पडतो. याबाबत आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा काय नियम आहे?
नोटांना जर रंग किंवा डाग लागलेला असेल तर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया नुसार या नोटा तरीही वैध आहेत. फक्त यामध्ये एकच अट आहे. त्या नोटांवर लिहीलेला नंबर मात्र वाचता येण्यायोग्य असला पाहीजे. रिझर्व्ह बॅंकेचे म्हणणे आहे की, नोटेवर जर राजकीय किंवा धार्मिक स्वरूपाचा संदेश लिहीलेला असेल तर अशा नोटा बदलता येणार नाही.
फाटलेली नोट तुम्ही कोणत्याही बॅंकेत जाऊन बदलू शकता. रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने वेळोवेळी फाटलेल्या नोटासंदर्भात परिपत्रक जाहीर केलेले आहे. त्यामुळे तुम्ही फाटलेल्या नोटा सहज कोणत्याही बॅंकेत जाऊन बदलू शकता.
परंतू रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार, एक व्यक्ती एका वेळी २० नोटांपेक्षा जास्त नोटा बदलू शकत नाही. तसेच बदल करण्यासाठी आणलेल्या नोटांची एकूण किंमत ही पाच हजारांपेक्षा कमी असली पाहीजे.
त्याचबरोबर पूर्णपणे फाटलेली व त्या नोटेचे तुकडे तुकडे झालेले असेल तर अशी नोट बदलता येत नाही. नोटा बदलताना बॅंकेत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. ते तुम्ही सहज विनामुल्य बदलू शकता.
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…
मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…