कोचर दाम्पत्य आणि वेणूगोपाल धूत यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

  44

मुंबई : आयसीआयसीआय बँक व व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी कोचर दांपत्य आणि वेणूगोपाल धूत यांना दोन दिवासांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. कोचर दाम्पत्यासह, वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कोठडी संपत असल्यानं आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सीबीआयकडून तिनही आरोपींची कोठडी वाढवून मागितली. परंतु, कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांकडून सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला.


आरोपींच्या वकिलांनी रिमांड वाढवून देण्यास विरोध दर्शवण्यात आला. तसेच, तीन दिवसांच्या कोठडीत कोणतीही नवी माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आलेली नाही. मुळात आरोपींकडे तपासयंत्रणेला देण्यासारखं काहीही नाही, जे होतं ते आधीच तपास अधिकाऱ्यांना दिलेलं आहे, असा दावा कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.


तिनही आरोपींचा जबाब नोंदवून झाला आहे. आता आणखीन काय चौकशी करणं बाकी आहे? आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं सीबीआयला विचारला. आम्ही केस डायरी बनवली आहे, अद्याप तपास सुरू आहे. चौकशीचे तपशील तपासाच्या या टप्यावर जाहीर करता येणार नाहीत, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला दिली. न्यायधीश एस. एम. मेनजोगे यांच्यासमोर आजची सुनावणी पार पडली.


कोचर दाम्पत्याला सीबीआयनं दिल्लीत अटक केली होती. त्यानंतर शनिवारी (२४) सकाळीच मुंबई सत्र न्यायालयात त्यांना रिमांडसाठी हजर करण्यात आलं असता त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. या कोठडीत सोमवारी आणखीन तीन दिवसांची वाढ करत ही कोठडी २८ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. या रिमांडला कोचर दाम्पत्यानं मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटक आणि कोठडीला आव्हान दिलं होतं. सुट्टीकालीन खंडपीठासमोर कोचर यांचे वकील कुशल मोर यांनी ही याचिका सादर करत त्यावर तातडीच्या सुनावणीची विनंती केली. त्यावेळी हायकोर्टानं कोचर दाम्पत्याला तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज कोठडी संपत असल्यानं तिनही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. आज तिघांनाही दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comments
Add Comment

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी