तुनिषा शर्माची वसईमध्ये मालिकेच्या सेटवरच आत्महत्या!

वसई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने शनिवारी दुपारी मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. तुनिशा २० वर्षांची होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.


तुनीषाने वसई पूर्वेच्या कामण येथील स्टुडिओमधील प्रसाधनगृहात गळफास लावला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तिने नेमकी आत्महत्या का केली तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का त्याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.


तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. तुनिषा सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत होती.


दरम्यान, नाताळच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्दैवी घटना घडल्याने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

भारतीय सिनेमाचा अभिमान ‘बूंग’ ६ मार्चला पुन्हा रिलीज, ट्रेलर झाला प्रदर्शित

एक्सेल एंटरटेनमेंट, चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि सूटेबल पिक्चर्स यांची BAFTA जिंकणारी पहिली भारतीय फिल्म ‘बूंग’ ६

माजी खासदाराचे निधन, मुख्यमंत्र्यांनी पाठवला शोकसंदेश

लातूर : लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, माजी कुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय करावे, टाळावे? जाणून घ्या

मुंबई: यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मीळ घटना जुळून आली आहे. २ मार्च रोजी होलिका दहन असून ३ मार्चला

UAE मध्ये रायगड आणि नवी मुंबईतील नागरिक अडकले; आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, प्रवाशांना फटका

रायगड: मध्यपूर्वेत भडकलेल्या तणावाची झळ आता थेट सामान्य प्रवाशांना बसू लागली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.