Sunday, June 22, 2025

मुंबई चिपी विमानसेवेच्या फेऱ्या ३० जानेवारीपासून नियमित धावणार

मुंबई चिपी विमानसेवेच्या फेऱ्या ३० जानेवारीपासून नियमित धावणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश


कणकवली : मुंबई -चिपी विमानसेवा येत्या ३० जानेवारीपासून दररोज सुरू राहणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई उडडाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नामुळे कोकणात जाणाऱ्या विमान प्रवाशांना ही नव्या वर्षात भेट मिळणार आहे.


वाजवी विमान भाडे आणि सिंधुदुर्ग चिपी विमानतळाच्या संदर्भात नारायण राणे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र पाठवले होते. या पत्रातून सिंधुदुर्ग-मुंबई-सिंधुदुर्ग मार्गासाठी विमान भाडे वाजवी करावे याकडे लक्ष वेधले होते. तसेच या मार्गावरील मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस चालवत आहे आणि ती दररोज सेवा द्यावी याकडे लक्ष राणे यांनी पत्रात नमूद केले होते.


या पत्राची तातडीने दखल घेत प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेवून सिंधिया यांनी मुंबई चिपी विमानसेवा येत्या ३० जानेवारी २०२३ पासून नियमित सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >