नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. जयंत पाटील यांचे एक वर्षासाठी निलंबन करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली होती. विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटलांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप केला जात आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक झाली.
नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस सुरु आहे. यावेळी अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. यावेळी विरोधकांना बोलू दिले जात नाही, असे म्हणत विरोधीपक्षातील आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. त्यावेळी ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ असे जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले.
यावेळी जयंत पाटील यांनी वापरलेला शब्द विधानसभा अध्यक्षांना उद्देशून असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. त्यानंतर काही वेळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. जयंत पाटील यांचे एका वर्षासाठी निलंबन करण्याची मागणी सत्ताधारी पक्षांनी केली होती.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…