मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 635 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 179 अंकांची घसरण झाली.
सेन्सेक्समध्ये आज 1.03 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,067 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 0.98 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,205 वर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज तब्बल 741 अंकांची घसरण होऊन तो 42,617 वर पोहोचला. त्याचवेळी फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज 1.75 ते 5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीमध्येही आज पाच पैशाची घसरण होऊन तो 82.81 वर पोहोचला.
डिव्हीज लॅब, सिप्ला, अपोलो हॉस्पिटल, सन फार्मा आणि डॉ. रेड्डीज लॅब या फार्मा कंपन्या टॉप निफ्टी गेनर्स ठरल्या. डिव्हीज लॅब कंपनीच्या निफ्टीमध्ये 4.99 टक्क्यांची वाढ झाली. तर अपोलो हॉस्पिटल मध्ये 3.69, सिप्ला 3.38, सन फार्मा 1.75 टक्यांची वाढ झाली. त्याचवेळी अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट्स, इंडसइंड बँक आणि बजाज फिन या टॉप निफ्टी लूजर्स कंपन्या ठरल्या.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…