Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट! भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट! भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

जळगाव : जळगाव मधील जामनेर तालुक्यात टाकळी खुर्द या गावात ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक झालेल्या दगडफेकीत एका भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज श्रीराम माळी (वय ३२) असे या निधन झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.


पराभूत झालेल्या झालेल्या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली व त्या दगडफेकीत धनराज माळी याचा मृत्यू झाल्याचा आरोप धनराज माळी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Comments
Add Comment