आता 'हायड्रोजन पॉवर'वर धावणार वंदे मेट्रो ट्रेन्स

नवी दिल्ली : भारतात आता हायड्रोजन पॉवरवर रेल्वे धावणार आहे. हायड्रोजनवर चालणारी ही वंदे मेट्रो ट्रेन पुढील वर्षात सुरु होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. स्वदेशी रुपात डिझाईन आणि निर्माण करण्यात आलेली ही ट्रेन देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन असणार आहे, जी डिसेंबर २०२३ मध्ये धावणार आहे, असेही मंत्री वैष्णव यांनी सांगितले.


प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता रेल्वेच्या वतीने वंदे मेट्रो तयार करण्यात येत आहे. सन १९५० आणि १९६० च्या दशकात डिझाईन करण्यात आलेल्या ट्रेन्सची जागा घेणार आहे. याची माहिती रेल्वे आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.


वैष्णव म्हणाले, आम्ही वंदे मेट्रो ट्रेनचे डिझाईन तयार करत आहोत हे डिझाईन मे किंवा जूनपर्यंत तयार होईल. जागतिक स्तरावर आम्ही हे वंदे मेट्रोचे डिझाईन तयार करत आहोत जी मोठी झेप असेल. या वंदे मेट्रो ट्रेन्सची निर्मिती इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे की, देशभरात १९५० आणि १९६० च्या दशकात डिझाईन करण्यात आलेल्या सर्व ट्रेन्स बदलण्यात येतील.

Comments
Add Comment

Iran Israel War : खामेनी यांच्या निधनावर भारताची श्रद्धांजली; परराष्ट्र सचिव यांनी दिली इराणी दूतावासाला भेट

भारत सरकारतर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन इराणचे दिवंगत

Sukhoi Su-30 MKI Crashes: भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले; टेकऑफनंतर बेपत्ता, पायलटचे काय झाले?

मुंबई: भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई-३० लढाऊ विमानाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या