Narendra Modi : महाराष्ट्राच्या विकासाचे अकरा नक्षत्र

नागपूर : वेगवेगळ्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज नागपुरात झाले. यावेळी त्यांनी या प्रकल्पांचा उल्लेख महाराष्ट्राच्या विकासाचे अकरा नक्षत्र असा केला.


मराठीतून भाषणाला सुरुवात करत मोदी म्हणाले, "आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकार्य करताना आपण पहिल्यांदा गणेश पूजन करतो.


आज आपण नागपुरात आहोत तर टेकडीच्या गणपतीला माझं वंदन" ११ डिसेंबरचा आजचा दिवस संकष्ट चतुर्थीचा पवित्र दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ सिताऱ्यांचे महान नक्षत्राचा उदय होत आहे.


मोदी म्हणाले,


पहिला तारा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग.


दुसरा तारा नागपूर एम्स आहे, ज्याचा लाभ विदर्भातील मोठ्या भागातील लोकांना होईल.


तिसरा तारा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थची स्थापना आहे.


चौथा तारा रक्तासंदर्भातील रोगांच्या नियंत्रणासाठी चंद्रपुरात बनलेले आयसीएमआरचे रिसर्च सेंटर,


पाचवा तारा पेट्रोकेमिकल क्षेत्रासाठी खूपच महत्वाचा सीपेट चंद्रपूर.


सहावा तारा नागपुरात नाग नदीचं प्रदुषण कमी करण्यासाठी सुरु झालेला प्रकल्प,


सातवा तारा नागपूरमध्ये मेट्रो फेज वनचा लोकार्पण आणि दुसऱ्या फेजचे भूमिपूजन.


आठवा तारा नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस.


नववा तारा नागपूर-अजनी रेल्वे स्टेशनचा विकास प्रकल्प.


दहावा तारा अजनीमध्ये बारा हजार हॉर्सपॉवरच्या इंजिनाच्या देखभाल प्रकल्प.


अकरावा तारा नागपूर-इटारसी लाईनवर कोली नरके मार्गाचं लोकार्पण आहे.


महाराष्ट्राच्या विकासाला अकरा ताऱ्यांचे हे नक्षत्र नवी दिशा देईन. नवी उर्जा देईन. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या अमृतमहोत्सवात ७५ हजार कोटी रुपयांच्या या विकास कामांना महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन.

Comments
Add Comment

पुणे मेट्रोचा विस्तार ठरला; विमानतळापर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल नवा मार्ग

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत मेट्रो सेवा आता थेट लोहगाव विमानतळाच्या दारात पोहोचणार आहे.

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला