Nawab Malik : जमीन हडपण्याच्या कटात नवाब मलिकांचा सहभाग

मुंबई : मुंबईतील कुर्ल्यातील मुनिरा प्लंबर आणि तिची आई मरिअम गोवावाला यांची जमीन हडप करण्याबाबत हसीना पारकर, सलीम पटेल व आरोपी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कट केला होता, असे दाखवणारे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे निरीक्षण विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपल्या जामीन निर्णयात नोंदवले आहे.


मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असणारे माजी कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने ३० नोव्हेंबरला फेटाळला आहे. या निर्णयाचे पत्रक मंगळवारी उपलब्ध झाले. न्यायालयीन कोठडीत असलेले मलिक हे सध्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल आहेत.


दाऊदच्या 'डी गँग' मधील सदस्यांसोबत नवाब मलिक यांनी एकमत करून गोवावाला कंपाऊंड ही जमीन हडप केली आहे अशा आरोपाखाली ईडीने मलिक यांच्याविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ईडीने त्यांना २३ फेब्रुवारीला अटक केली आहे.


'ईडीने पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अन्वये साक्षीदारांचे जबाब व तपासाच्या दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सर्व आजही मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची कंपनी सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. ही मालमत्ता घेण्याबाबत सलीम पटेल याच्यांसोबत अर्जदाराचे व्यवहार व एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन ईडीकडून पीएमएलए कायद्यातील तरतुदी लावणे उचित आहे', असे निरीक्षणही न्या. रोकडे यांनी आपल्या ४३ पानी निकालामध्ये नोंदवले आहे.

Comments
Add Comment

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी