'आहे तर दाखवायलाच हवं..'
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. पण यावेळी तिला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणे महागात पडले आहे. प्राजक्ता माळीने काही बोल्ड फोटो शेयर केले आहेत. या फोटोला कॅप्शनही भन्नाट दिले आहेत. त्यामुळे प्राजक्ताला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा हाय स्टाइलचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. बन हेअरस्टाइल करत प्राजक्ताने खास लूक केला आहे.
प्राजक्ताने या फोटोशूटमध्ये हा ड्रेस पायाच्या वरपर्यंत घेऊन काही पोज दिल्या आहेत. परंतू तिचे हे फोटोशूट पाहून चाहते नाराज झाले आहेत.
विशेष म्हणजे यावर तिने एक भन्नाट कॅप्शन दिले आहेत. ‘जर तुमचे शरीर, सुंदर शेप मध्ये असेल तर बिनधास्त दाखवायला हवं’ असे तिने म्हटलंय. फोटोवरील या कॅप्शनमुळे प्राजक्ता चांगलीच ट्रोल झाली आहे.
‘तुझ्याकडून ही अपेक्षा नाही’, ‘तुझी सई ताम्हणकर होत चाललीय’, ‘तुला अशा बोल्डनेसची गरज नाही’, ‘तुझ्याविषयीचा आदर कमी होत चाललाय’ अशा अनेक कमेंट तिच्या फोटोंवर आल्या आहेत. तर काहींनी तिचे कौतुकही केले आहे.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…