Saturday, June 21, 2025

Conversion : नगर जिल्ह्यात घडला धर्मांतराचा धक्कादायक प्रकार

Conversion : नगर जिल्ह्यात घडला धर्मांतराचा धक्कादायक प्रकार

राहुरी फॅक्टरीतील डी पॉल स्कुलचे फादर जेम्स राहुरी पोलिसांकडून अटकेत


राहुरी : नगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल स्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय शीख धर्मीय विद्यार्थ्याच्या धर्माचा अवमान केल्याप्रकरणी (conversion) राहुरी पोलीस ठाण्यात डी पॉल इंग्लिश मिडियम स्कुलचा उपप्राचार्य फादर जेम्स विरोधात धर्माचा अवमान केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी फादर जेम्स यास रात्री ताब्यात घेतले आहे.


काही दिवसापूर्वी पंजाब येथील कमलसिंघ पास्टर याने असाच राहुरी येथे येऊन पैशांचे अमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता. पण सदर प्रकार स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळून लावला आणि पास्टर विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असताना हा दुसरा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे.


याबाबत डी पॉल इंग्लिश मीडियम स्कुलमधील १४ वर्षीय विद्यार्थ्याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मी, माझे दोन मित्र शाळेच्या झाडाखाली क्रीडा स्पर्धेकरिता उभे असताना तेथे उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांनी येऊन फिर्यादी विद्यार्थी यास तुमच्या शीख धर्मात दिलेल्या रितीरीवाजाप्रमाणे डोक्यावर घातलेली पगडी काढून केस कापून शाळेतील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे रहा, आमच्या धर्माचा स्वीकार कर, असे म्हणून दमदाटी करून मारहाण करण्याकरीता अंगावर धावून दमदाटी केली.


सदर १४ वर्षीय शीख धर्मीय विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून फादर जेम्स यांच्याविरुद्ध पोलिसांत दिनांक १ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तसेच या बाबत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी फादर जेम्स यास राहुरी फॅक्टरी परिसरातून ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >