नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बँक उद्या म्हणजे एक डिसेंबरला रिटेल डिजिटल रुपया (Digital Rupee) लाँच करणार आहे. याचा पहिला पायलट प्रोजेक्ट होणार आहे. यात रुपयाचे निर्माण, डिस्ट्रीब्युशन, रिटेल वापर याच्या संपूर्ण प्रक्रीयेचे टेस्टिंग केले जाणार आहे. यापूर्वी केंद्रीय बँकेने १ नोव्हेंबरला होलसेल ट्रँझॅक्शनसाठी डिजिटल रुपया लाँच केला होता. (How to use Digital Rupee)
रिझर्व बँकने या डिजिटल करंसीला सेंट्रल बँक डिजिटल करंसी (CBDC) नाव दिले आहे. १ डिसेंबरपासून ठराविक ठिकाणी हा रुपया चलनात आणला जाणार आहे. यात ग्राहकापासून ते मर्चंटपर्यंत सर्वांचा समावेश असेल.
ई-रुपी (e₹-R) डिजिटल टोकनचे काम करेल. सेंट्रल बँक डिजिटल करंसी (CBDC) भारतीय रिझर्व बँकेकडून आणल्या जाणाऱ्या करंसी नोटांचे डिजिटल स्वरुप असणार आहे. ही करंसी नोटांप्रमाणेच पूर्ण वैध समजली जाणार आहे. याचा वापर व्यवहारासाठी केला जाईल.
e₹-R चे वितरण बँकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. डिजिटल वॉलेटद्वारा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला किंवा विक्रेत्याला ते देऊ शकाल. तुमच्या फोनमध्ये ज्या बँकेचे अॅप असेल त्या बँकेच्या डिजिटल वॉलेटमधून तुम्ही व्यवहारासाठी हा रुपया वापरू शकाल. यासाठी तुम्ही क्यूआर (QR) कोड्स स्कॅन करून व्यवहार करू शकता.
पायलट प्रोजेक्टमध्ये ८ बँकांचा समावेश असणार आहे. पण पहिल्या स्तरातली सुरूवात देशातल्या चार शहरांत SBI, ICICI, यस बँक आणि IDFC फर्स्ट बँकेच्या माध्यमातून होईल. यानंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक या पायलट प्रोजेक्टमध्ये सहभागी असणार आहेत.
या नव्या डिजिटल रुपयाला कागदी नोटेच्या रुपया एवढेच महत्व आहे. तुम्हाला हवे तर ही करंसी देऊन तुम्ही नोट घेऊ शकाल. रिझर्व बँकेने या डिजिटल करंसीला CBDC-W आणि CBDC-R अशा दोन गटात विभागण्यात आलं आहे. CBDC-W चा अर्थ होलसेल करंसी आहे. तर CBDC-R चा अर्थ रिटेल करंसी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला डिजिटल करण्यासाठी उचललेले हे पाऊल महत्वपूर्ण समजले जात आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…