Sunday, June 22, 2025

Uday Samant : देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का?

Uday Samant : देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का?

मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एक जुना फोटो शेअर करत निशाणा साधला आहे. "आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का?" असा रोखठोक सवाल विचारला आहे.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही याविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. सामंत यांनी ट्विटर अकाऊंटवरून एक जुना फोटो शेअर करत निशाणा साधला आहे.


https://twitter.com/samant_uday/status/1596770940687650818

उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. "राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद माजी आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तत्कालीन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करताना... आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का???" असं सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Comments
Add Comment