kho-kho tournament : महाराष्ट्राच्या महिला संघाचे विजेतेपद कायम

उस्मानाबाद (वार्ताहर) : यजमान महाराष्ट्राच्या महिला खो-खो (kho-kho tournament) संघाने ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. महाराष्ट्राच्या महिलांचे हे २४ वे अजिंक्यपद ठरले आहे.


भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने भारतीय विमान प्राधिकरण संघावर ११-९ असा डावाने शानदार विजय मिळविला.


महाराष्ट्राच्या पहिल्या तुकडीनेच संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. प्रियांका इंगळे (३.३० मिनिटे व २ गुण), अपेक्षा सुतार ( २.२० व १.१० मिनिटे व १ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. पूजा फरगडेने ४ गडी बाद करीत आक्रमणाची बाजू सांभाळली. दुसऱ्या डावात रेश्मा राठोड २.२० व दिपाली राठोडने २.३० मिनिटे संरक्षण केले. भारतीय विमान प्राधिकरण संघाकडून वीणा (१.१० मिनिटे नाबाद), ऋतुजा खरेने (१.२० मिनिटे), जान्हवी पेठेने (१.०० मिनिटे व १ गुण) संरक्षण करीत एकाकी लढत दिली.


पुरुष गटात रेल्वे सुसाटच


पुरुषांच्या गटात भारतीय रेल्वेने यजमान महाराष्ट्रावर १४-१२ असा ४५ सेकंद राखून विजय मिळवित हॅटट्रिक केली. रेल्वेचे हे ११वे विजेतेपद आहे. नाणेफेक जिंकून रेल्वेने संरक्षण स्वीकारले.


महाराष्ट्राने पहिल्या आक्रमणात ६ गडी बाद केले. रेल्वेने ७ गडी बाद करीत मध्यंतरास एका गुणाची निसटती आघाडी घेतली. महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही ६ गडी टिपले. विजयासाठी रेल्वेला ६ गुण मिळवायाचे होते. त्यांनी ७ गुण मिळवित हॅटट्रिक केली.


रेल्वेकडून अक्षय गणपुले (२.०० व १.३० मिनिटे), महेश शिंदे (१.५० व १.४० मिनिटे व २ गुण), अमित पाटील (१.३० मिनिटे व १गुण), विजय हजारे (१.१० मिनिटे), मिलिंद चौरेकर ३ गुण यांनी शानदार खेळी केली. महाराष्ट्रकडून रामजी कश्यप (१.४० व १.३० मिनिटे व १ गुण), प्रतिक वाईकर ( १.५० मिनिटे), अक्षय भांगरे (१.१० मिनिटे व ४ गुण) यांनी लढत दिली.

Comments
Add Comment

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड

भारत ऐतिहासिक कामगिरी करणार ?

मुंबई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये २००७ पासून आतापर्यंत भारत तीन वेळा फायनलमध्ये धडकला आहे. टीम

Pakistan Player : खेळाडू की हैवान; पाकिस्तानी खेळाडूंकडून मैदानाबाहेर महिलांचा विनयभंग

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी आता एका नव्या वादामुळे पाकिस्तानी खेळाडू

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.

मार्को जेन्सनच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका सुस्थितीत

कोलकाता : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-२० उपांत्य फेरीतील महत्त्वाच्या

T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील