मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना एसआरएने दणका दिला आहे. (Kishori Pednekar slapped by SRA) पेडणेकर यांच्या वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएने मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्यासाठी हा पहिला मोठा झटका आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर एसआरएने हे आदेश दिले.
किशोरी पेडणेकर यांनी त्यांची कंपनी कीश कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वरळी गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील ४ सदनिका बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या, अशी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली होती. एसआरएने सोमय्यांची ही तक्रार स्वीकारत हे चार गाळे ताब्यात घेत असल्याचे आदेश दिले आहेत. पुढील ४ दिवसांत मुंबई मनपा अधिकारी हे गाळे रिकामे करून एसआरएच्या ताब्यात देतील, असे सोमय्यांनी म्हटले आहे.
सोमय्या यांनी पेडणेकर यांच्या चार सदनिकांविषयी एसआरएमध्ये तक्रार केली होती. पेडणेकर यांनी या सदनिका बळकावल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या बेनामी सदनिकांवर कारवाई करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर एसआरएने महापालिकेला हे आदेश दिले आहेत. एसआरए अधिकार्यांनी किशोरी पेडणेकर, किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस आणि बेनामी सहकारी विरुद्ध कलम ३ए अंतर्गत या सदनिकांचे निष्कासन करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…