Charger : मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेटसाठी एकच चार्जर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या काळानुसार, डिजिटलायझेशमुळे देशात गॅझेटचा वापर वाढला आहे. मोबाइलसह, लॅपटॉप आणि टॅबलेटच्या चार्जरचा भार अनेकांना सांभाळावा लागतो. आता, लॅपटॉप, मोबाइलच्या चार्जरची कटकट संपणार आहे. मोबाइल, लॅपटॉपसाठी आता एकाच पद्धतीच्या चार्जरचा (Charger) वापर सुरू होणार आहे. या गॅझेटच्या चार्जिंगसाठी 'यूएसबी-सी'चा वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने बोलविलेल्या बैठकीत संबंधितांनी या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. या निर्णयाचा पुढे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीत मोबाइल उत्पादक (Charger) कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यापार संघटना, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, आयआयटीचे अधिकारी, केंद्र सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. ग्राहक विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, संबंधितांनी स्मार्ट डिव्हाइससाठी एक कॉमन चार्जिंग पोर्टवर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता कॉमन चार्जिंग पोर्टचा मार्ग मोकळा झाला आहे. कमी किमतीमधील फीचर फोनसाठी एक वेगळा पोर्ट असू शकतो, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र, हा निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल, याबाबत स्पष्ट करण्यात आले नाही.



ई-कचरा कमी होणार


एकाच पद्धतीच्या चार्जरमुळे (Charger) ई-कचरा कमी होणार आहे. एका अहवालानुसार, वर्ष २०२१ मध्ये भारतात ५ दशलक्ष टन ई-कचरा तयार होतो. सर्वाधिक ई-कचरा असणाऱ्या देशांच्या यादीत चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. टॅबलेट, स्मार्टफोन आणि लॅपटॉपसाठी यूएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्टचा वापर करणाऱ्या संबंधितांची मान्यता मिळाली, तर कमी किमतीमधील फीचर फोन्सना यातून वगळण्यात आले आहे.


अॅपलकडूनही आगामी आयफोनमध्ये USB Type-C पोर्ट असणार आहे. सध्या अॅपलच्या माध्यमातून लाइटनिंग पोर्टचा वापर करतात. आता आगामी मोबाइलमधून एकच चार्जर होणार असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. युरोपियन युनियनकडून गॅझेटसाठी एकच चार्जर असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ब्लूमबर्गने दिलेल्या एका वृत्तानुसार, युरोपियन युनियनने एक तात्पुरता कायदा मंजूर करत आयफोनसह युरोपियन युनियनमधील देशांमध्ये विक्री होणाऱ्या मोबाइलमध्य सी टाईप चार्जिंग पॉइंट असावे. युरोपियन युनियनकडून २०२४ पर्यंत कॉमन चार्जरसाठी बाजारात यावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा