Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना विनयभंग प्रकरणात ठाणे कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

१५ हजारांच्या जातमुचलक्यावर आव्हाड (Jitendra Awhad) यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला.

रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाणे कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

रिदा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वाय जंक्शन येथे रविवारी रात्री एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले. या लोकार्पण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना रिदा त्यांना भेटण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाजूला हो, असे म्हणत ढकलले, असे तक्रारीत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या...

जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा

‘हर हर महादेव’ चित्रपट वाद प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक

जितेंद्र आव्हाड वेडेचाळे करतायेत: आशिष शेलार

Comments
Add Comment