मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे.
काही महिन्यांपूर्वी १ हजार १६५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली होती. आता २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होणार असून १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहेत.
तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार : १८ नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची मुदत : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
अर्ज छाननी : ०५ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याचा दिनांक : ७ डिसेंबर
निवडणूक चिन्ह वाटप : ७ डिसेंबर दुपारी ३ नंतर
मतदानाची तारीख : १८ डिसेंबर
मतमोजणी आणि निकाल : २० डिसेंबर
निकालाची अधिसूचना : २३ डिसेंबर
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…